दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपाने आम आदमी पक्षाच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. यानुसार दिल्लीत भाजपाची सत्ता येणार हे निश्चित आहे. अशातच आता आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे. आपसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.