नाकारलेल्यांच्या हाती खोट्याचे शस्त्र; मोदींचे प्रतिपादन

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 21 जानेवारी 2020

"ज्यांना निवडणुकीत जनतेने नाकारले तेच आता खोटे पसरविण्याच्या शस्त्राने कारस्थाने करीत आहेत,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) होणाऱ्या तीव्र विरोधासंदर्भात विरोधी पक्षांवर आज हल्लाबोल केला.

नवी दिल्ली - "ज्यांना निवडणुकीत जनतेने नाकारले तेच आता खोटे पसरविण्याच्या शस्त्राने कारस्थाने करीत आहेत,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) होणाऱ्या तीव्र विरोधासंदर्भात विरोधी पक्षांवर आज हल्लाबोल केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार समारंभ मुख्यालयात झाला. त्या वेळी मोदींनी विरोधकांसह प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथसिंह व नितीन गडकरी या माजी अध्यक्षांसह सर्वश्री राधामोहनसिंह, माजी गृहमंत्री हंसराज अहिर, माजी संघटनमंत्री रामलाल, बी. एल. संतोष, विजया रहाटकर, पीयूष गोयल आदी उपस्थित होते. 

जे. पी. नड्डा : चाणाक्ष व्यूहरचनाकार, संघटक

"सीएए'विरोधी आंदोलनांमागे कॉंग्रेससह विरोधक असल्याचे भाजपचे मत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शहा यांच्यासह भाजपचे सारे मंत्रीही कार्यक्रम व जाहीर सभा घेऊन सीएए कसा सकारात्मक आहे, याबाबत सांगत आहेत. 

मोदी म्हणाले, 'भाजप ज्या आदर्शांवर चालला आहे, त्याबद्दलच काहींना आक्षेप आहे. ज्यांना जनतेनेच नाकारले व ज्यांना देश आता स्वीकारायला तयार नाही, त्यांच्या हाती आता एकच शस्त्र उरले आहे. ते म्हणजे प्रत्येक गोष्टीबाबत खोटे, असत्य, भ्रम यांचा फैलाव करणे व आपल्या इकोसिस्टीमच्या मदतीने ती पोचविणे. अशा या काळात आम्हाला प्रसारमाध्यमांकडून मदत मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. त्याची आम्हाला सवय नाही आणि आमचीही त्यांच्याकडून अपेक्षाच नाही. ही टोळी कधीच आमच्याबरोबर नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून मदतीसाठी भाजपने वेळ वाया घालवूच नये.'' 

'गेले अनेक दिवस देशात (सीएए जागृतीसाठी) आमच्या नेत्यांचे रोज 10 ते 15 कार्यक्रम होत आहेत व प्रत्येक कार्यक्रमात 50 हजार ते एक लाखाची गर्दी असते. पण, आम्हाला ते (टीव्हीवर) दिसणारच नाही. याची सवय आम्हाला आहे. कारण, जनतेच्या आशीर्वादाने व विश्‍वासानेच आम्ही भाजप कार्यकर्ते पुढेपुढे जात राहिलेले आहोत. लोकांशी संवाद व संपर्क हीच आमची ताकद आहे. त्यामुळेच इतके सत्य पसरवूनही हे लोक आम्हाला हलवू शकलेले नाहीत,'' असेही मोदींनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi talking on caa agitation