esakal | रुग्णसंख्या कमी झाली, तरी लॉकडाऊन का वाढवला? केजरीवाल म्हणाले..
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

दिल्ली: रुग्णसंख्या आटोक्यात, तरी लॉकडाऊन का वाढवला?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीतील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांच्या जवळ गेली होती. पण, आता संसर्ग आटोक्यात येत आहे. असे असताना दिल्ली सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत 24 मेपर्यंत लॉकडाऊन असेल. (Delhi extends lockdown week even cases dip Kejriwal explains why)

दिल्लीत गेल्या 24 तासांत 6 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्णसंख्या आढळून आली आहे. शिवाय पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदरात घट झाली आहे. असे असताना लॉकडाऊन वाढवण्याचा, तसेच निर्बंध शिथिल न करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न दिल्लीकरांना पडला आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले आहेत की, आतापर्यंत केलेली प्रगती, घाईने सर्व काही सुरु करुन पाण्यात घालू इच्छित नाही. राजधानी लगेच सर्वांसाठी खुली करु शकत नाही.

हेही वाचा: हिंगोली ते दिल्ली, जाणून घ्या राजीव सातव यांचा राजकीय प्रवास

कोरोनाच्या परिस्थितीवर आपण काहीप्रमाणात ताबा मिळवला आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. अशात कोरोनाविरोधातील लढ्यात आतापर्यंत जे काही मिळवलंय, ते अचानक निर्बंध हटवून गमावू शकत नाही, असं केजरीवाल म्हणाले. पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर दिल्लीत 20 एप्रिलला लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकांचा जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन महत्त्वाचा असल्याचं केजरीवाल म्हणाले होते.

हेही वाचा: दिल्ली जवळील हे आहेत बेस्ट १० पर्यटन स्थळ

दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट 35 टक्क्यांच्या पुढे गेली होती, त्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीत ती कमी झाली आहे. सध्या दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांवर आला आहे. तसेच गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या 6,500 आढळली आहे. केजरीवाल म्हणाले की, पुढील आठवड्यात रिकव्हरी रेट वाढण्याची आशा आहे, दिल्ली आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण, सध्या लॉकडाऊनमधून कोणतीही सूट देण्यात येणार नाही.