esakal | दिल्ली जवळील हे आहेत बेस्ट १० पर्यटन स्थळ
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्ली जवळील हे आहेत बेस्ट १० पर्यटन स्थळ

दिल्ली जवळील हे आहेत बेस्ट १० पर्यटन स्थळ

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः उन्हाळ्यात प्रत्येकाला थंड आणि हिरवेगार वातावरणात फिरायला नक्की आवडत असते. त्यात तुम्ही दिल्लीत (Delhi) आहात तर 300 ते 600 किमीच्या अंतरातील चांगल्या पर्यटन (tourist destinations) स्थळांची (spot)माहिती ही आहेत..

( Delhi stet near top tan tourist destinations spot)

हेही वाचा: नेपाळ देशातील पोखरा शहराचे सौदंर्य पाहले का ? नसेल तर नक्की जा !

कांगोजोडी गाव

तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर हिमाचल प्रदेशातील कांगजोडी गावात नक्की जा. सिरमौर जिल्ह्यातील हे गाव असून दिल्लीपासून 275 कि.मी. अंतर आहे. येथील सुंदर हिरवेगार दृष्य तुमचा थकवा दुर करेल. ॉ

बिनसर

जर तुम्हाला दररोजच्या धावपळीपासून दूर जायचे असेल तर उत्तराखंड येथील बिनसरला येथे जाण्याची नक्की योजना बनवा. या छोट्याश्या हिल स्टेशनवर तुम्हाला नक्की आनंद मिळेल.

कसौनी

उत्तराखंड मधील कसौनीचे दिल्लीहून अंतर 417 किलोमीटर आहे. आणि एकदा तुम्ही या सुंदर जागी आलात तर तुमचे मन येथून लवकरच जाण्यास नाही म्हणणार.

लॅन्सडाउन

उत्तराखंड मधील अजून स्थळ लॅन्सडाऊन हे तुम्हाला निसर्गाच्या जवळ पोहचवतो. दिल्लीपासून या सुंदर जागेचे अंतर फक्त 279 किमी आहे.

हेही वाचा: उत्तराखंडमधील जागेश्वर धाम आहे प्रसिध्द ? कशासाठी तर वाचा !

पिथौरागड

हे प्रसिद्ध ठिकाण दिल्लीपासून 3 463 कि.मी. अंतरावर आहे. हिल स्टेशन नसून देखील येथील हवामान कायम पर्यटनासाठी चांगले आहे. हे स्थळ डोगरांनी वेढलेले आहे.

ऋषिकेश

उत्तरांखड मधील धार्मिक स्थळामध्ये ऋषिकेश हे महत्वाचे स्थळ आहे. येथे पौराणिक मंदिर आणि आश्रमांव्यतिरिक्त, उंच पर्वत आणि घनदाट जंगल पाहण्सायास मिळतात. दिल्लीपासून 244 किमी अंतर असून येथे पर्वतांच्या खोऱ्यातून वाहनाऱ्या नद्या, तसेच गंगा नदीत रिव्हर राफ्टिंगचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. तसेच बंजी जंपिंग, धबधबा, गिर्यारोहण आणि ट्रेकिंगसाठीही जाऊ शकतात.

शोझा

हिमाचल प्रदेशचे शोझा हे स्थान फारच कमी लोकांना माहित आहे. पर्यटकांच्या गर्दी पासून दूर आहे. हे ठिकाण निर्सग संपन्न आहे.

चंदीगड

दिल्ली-एनसीआरच्या नागरिकांना चंदीगडची सुंदर बाजारपेठ नेहमी आकर्षीत करते. याशिवाय सुखना लेक, रॉक गार्डन आणि आणि किकर लॉजजवळील झिप लाईनचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा: 'बेंगलुरू पॅलेस' मध्ये सुपरहिट चित्रपटांचे झाले चित्रीकरण; घ्या जाणून !

भरतपूर पक्षी अभयारण्य

राजस्थान मधिल ओसला भरतपूर पक्षी अभयारण्य जगातील सर्वोत्तम पक्षी अभयारण्य पैकी एक आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील त्याला ओळखले जाते. हे राजस्थानमध्ये आहे. येथे आपल्याला पक्ष्यांची हजारो दुर्मिळ आणि नामशेष प्रजाती आढळतील

अलवर

निसर्गाच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक वारसा किंवा परंपरा पाहायला आवडत असेल तर राजस्थान मधील अलवरला जा. तुम्ही येथून वर राजस्थानची संस्कृती पाहू शकतात. तसेच पर्यटकांमध्ये सिलीसाध तलावही खूप लोकप्रिय आहे.