esakal | शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली सुरु; प्रजासत्ताक दिनी सरकारवर दबाव आणण्याची रंगीत तालीम
sakal

बोलून बातमी शोधा

Tractor Rally

सरकारशी आठवेळा झालेल्या चर्चेच्या बैठकीनंतरही अद्याप काही यशस्वी तोडगा निघू शकला नाहीये.

शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली सुरु; प्रजासत्ताक दिनी सरकारवर दबाव आणण्याची रंगीत तालीम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल आज गुरुवारी 43 दिवस झाले आहेत. सरकारशी आठवेळा झालेल्या चर्चेच्या बैठकीनंतरही अद्याप काही यशस्वी तोडगा निघू शकला नाहीये. ऐन कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांच्या निश्चय जराही ढळलेला नाहीये. अशातच आज गुरुवारी जवळपास 40 शेतकरी संघटना दिल्लीच्या आसपासच्या भागात मोठी ट्रॅक्टर रॅली काढत आहेत.

हेही वाचा - मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमधील दंगल पाहून अस्वस्थ; लोकशाहीत शांतपणे सत्तेचे हस्तांतरण आवश्यक

ही ट्रॅक्टर रॅली संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने काढला जात आहे. या अंतर्गत 40 शेतकरी संघटना येतात. ही रॅली गाझीयाबादमधून सुरु होत हरियाणाच्या पलवलपर्यंत जाणार आहे. त्यानंतर ही रॅली पुन्हा याच मार्गाने परतणार आहे.

येत्या 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी याहूनही मोठा मार्च काढण्याच्या तयारी हे आंदोलक शेतकरी आहेत. आज शेतकरी सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. त्यांनी आपला मार्ग देखील ठरवला आहे. यामुळे रस्त्यावरील असलेले ट्राफिक वळवण्यात आलं आहे.  शेतकरी KMP हायवे आणि पेरिफेरल एक्स्प्रेसवे वर ट्रॅक्टर रॅली काढत आहेत.

ही रॅली सिंघू, टिकरी, गाजीपूर आणि शाहजहांपूरमधून काढली जाईल. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, 26 जानेवारी रोजी काढल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीची ही एकप्रकारे रंगीत तालिमच आहे. शेतकऱ्यांनी सरकारला अशी सूचना दिली आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये याचप्रकारची ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. सोनीपत, गाझीयाबाद, नॉयडा प्रशासनाने ट्रॅक्टर रॅलीमुळे विशेष नियोजन केलं आहे. वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवे वर अनेक जागी ट्राफिक वळवण्यात आलं आहे. 

loading image
go to top