१ ऑक्टोबर पासून दिल्लीत मोफत वीज बंद; मागेल त्यालाच मिळणार योजनेचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejriwal

१ ऑक्टोबर पासून दिल्लीत मोफत वीज बंद; मागेल त्यालाच मिळणार योजनेचा लाभ

मुंबई : १ ऑक्टोबरपासून दिल्लीत मोफत वीज मिळणे बंद होईल. जो मागेल त्यालाच सबसिडी दिली जाईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दूरचित्रसंवादाद्वारे (video conferencing) दिली.

ग्राहकांना सबसिडी हवी आहे का असे विचारले जाईल. जे ग्राहक सबसिडीचा पर्याय निवडतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

दिल्लीत नागरिकांना मोफत वीज मिळावी यासाठी सरकार सबसिडी देते; मात्र अनेक नागरिकांनी केजरीवाल यांना कळवले की, ते वीज देयक भरण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना मोफत वीज नको आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून ग्राहकांना विचारले जाणार आहे की, त्यांना मोफत वीज हवी आहे का. जे ग्राहक सबसिडीची मागणी करतील त्यांनाच सबसिडी दिली जाणार आहे.

हेही वाचा: Delhi Budget : 'केजरीवाल सरकार 20 लाख नोकऱ्या देणार'

भरल्या जाणाऱ्या वीज देयकांची रक्कम शाळा, रुग्णालये बनवण्यासाठी वापरावी अशी लोकेच्छा असल्यामुळे केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्राहकांना सबसिडी हवी की नको यासाठी पर्याय दिले जाणार आहेत.

सध्या दिल्लीतील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंतची वीज मोफत मिळते. तसेच दर महिन्याला २०१ ते ४०० युनिट वीजेवर ८०० रुपये सबसिडी मिळते.

Web Title: Delhi Free Electricity Option Will Stop From 1st Oct Subsidy Will Be Optional Kejriwal Said

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Arvind Kejriwaldelhi
go to top