Delhi Accident cctv : घटनेपूर्वी अंजलीचं मैत्रिणीसोबत कडाक्याचं भांडण, त्यांना हॉटेलमधून बाहेर काढलं...

Delhi Accident cctv
Delhi Accident cctv esakal

Death of Anjali Singh in New Delhi

१ जानेवारीच्या पहाटे २ ते ५ या दरम्यान नेमकं काय झालं? असा प्रश्न सबंध देशाला सध्या पडला आहे. कारण एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किलोमीटर पीडितेला फरफटत नेलं होतं. पोलिसांना जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शरीरावरील मांस खरवडून गेलं होत. आता या घटनेचा आणखी एक एँगल समोर आला आहे.

Delhi Girl Accident

दिल्लीतल्या सुलतानपुरी कंझावला घटनेचा नवीन व्हीडिओ समोल आलेला आहे. हा व्हीडिओ दिल्ली पोलिसांचा महत्त्वाचा पुरावा ठरु शकतो. या व्हीडिओमध्ये मृत अंजली आणि तिच्या मैत्रिणीमध्ये भांडण सुरु असल्याचं दिसून येतंय. हॉटेलबाहेरचं हे सीसीटीव्हा फुटेज आहे.

हेही वाचाः ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

दोघींचं भांडण हॉटेलमध्ये सुरु होतं, परंतु इतरांनी तक्रार केल्याने त्यांना हॉटेल स्टाफने बाहेर काढलं. दोघी स्कुटीवर एकत्र गेल्या असल्या तरी गाडीवर बसण्यापूर्वी त्यांचं भांडण झालं.

हा व्हीडिओ १ जानेवारी रोजी पहाटे सव्वादोन वाजताचा आहे. कृष्ण विहार परिसरातून दोन्ही मुली स्कुटीवरुन जात असल्याचं दिसून येतंय. यानंतर थोड्याच वेळाने आरोपींच्या बलेनो कारने स्कुटीला धडक दिली. त्यानंतर व्हीडिओमध्ये कारमधून तरुणीची चप्पल पडत असल्याचंही दिसून येत आहे.

Delhi Accident cctv
Delhi Girl Accident : अपघातानंतर अंजली घरी गेली होती; मैत्रिणीच्या जबाबाने खळबळ

हॉटेल मॅनेजरने केला खुलासा

ज्या हॉटेलमधून अंजली आणि तिची मैत्रीण निघाली होती. त्या हॉटेलच्या मॅनेजरने मोठा खुलासा केला आहे. मॅनेजरने सांगितलं की, अंजलीचं आपल्या मैत्रिणीसोबत जोराचं भांडण सुरु होतं. दोघी एकमेकींना शिव्या देत होत्या. त्यामुळे हॉटेलमध्ये इतरांना त्रास होऊ लागला. त्यांना शांत करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकलं नसल्याने हॉटेलबाहेर काढून दिलं. मग त्या बाहेरही भांडू लागल्या. नंतर स्कुटीवर बसून निघून गेल्याचं हॉटेल मॅनेरजरने सांगितलं. अपघातानंतर अंजलीची मैत्रीण तिथून निघून गेल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com