Delhi pollution: दिल्लीत उद्यापासून प्राथमिक शाळा बंद; प्रदूषणामुळे आली 'ही' वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi air Pollution

Delhi Pollution: दिल्लीत उद्यापासून प्राथमिक शाळा बंद; प्रदूषणामुळे आली 'ही' वेळ

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे जीवनमान कठीण झालं आहे. हवेतलं प्रदूषण एवढं वाढलंय, की उद्यापासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

शुक्रवारी सकाळी एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला. दिल्लीमध्ये दाट धुकं पसरल्याचं चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचं प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर फुप्फुसासाठी धोकेदायक समजलं जातं. त्यामुळे उद्यापासून दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली.

हेही वाचाः भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

तर नोएडामध्ये आठवीपर्यंत्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. दिल्लीच्या अनेक परिसरामध्ये हवेची गुणवत्ता घसरलेली आहे. यामध्ये मुंडका, आनंद विहार, जहाँगिरपुरी, विवेक विहार, नरेला, अलीपूर, दिल्ली विद्यापीठ या भागांचा समावेश आहे.

दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. येत्या १० तारखेला त्यावर सुनावणी होईल. दिल्लीमध्ये डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आलेली आहे.