Ayushman Bharat : आरोग्य विभागात शंभर दिवसांत बदल करू; दिल्ली सरकारची घोषणा, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई
Delhi Healthcare : दिल्ली सरकारने येत्या १०० दिवसांत आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली असून, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पोलिक्लिनिक आणि आयुष्मान भारत योजनेसह नवीन प्रकल्प राबवले जाणार आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या आरोग्य सुविधांमध्ये येत्या शंभर दिवसात व्यापक बदल करण्याची घोषणा आज दिल्लीचे आरोग्यमंत्री डॉ. पंकज सिंह यांनी विधानसभेत केली.