दिल्लीत पेट्रोल स्वस्त, VAT हटवला, ठाकरे सरकारही करणार का? | Petrol Rate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejariwal

दिल्लीत पेट्रोल स्वस्त, VAT हटवला, ठाकरे सरकारही करणार का?

नवी दिल्ली : दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejariwal) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने पेट्रोलचे दर 8 रुपयांनी कमी केले आहेत. तसेच व्हॅटमध्येही मोठी कपात केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्रीपासूनच हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठाकरे सरकार (maharashtra government) देखील असा निर्णय घेणार का? असा सवाल नागरिकांकडून करण्यात येतोय.

..आणि दिल्लीत पेट्रोल चक्क 8 रुपयांनी स्वस्त

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यता आला. केंद्र सरकारने पाच रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारांनीही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते.

व्हॅटमध्येही मोठी कपात

देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. केंद्र सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी केलेले असतानाच दिल्ली सरकारने पेट्रोलचे दर 8 रुपयांनी कमी केले आहेत. तसेच व्हॅटमध्येही मोठी कपात केली आहे. राज्यात व्हॅट 30 टक्क्यावरून 19.4 टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.