esakal | दिल्लीचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक; हजारो नागरिक करताहेत कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejriwal.jpg

कोरोना रुग्णांची देशभरातील संख्या वाढत चालली असतानाच राजधानी दिल्लीत मात्र रूग्णसंख्येचा उतरता कल स्पष्ट दिसत असून हा मोठा दिलासा असल्याचे सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे.

दिल्लीचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक; हजारो नागरिक करताहेत कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली, ता. २० : कोरोना रुग्णांची देशभरातील संख्या वाढत चालली असतानाच राजधानी दिल्लीत मात्र रूग्णसंख्येचा उतरता कल स्पष्ट दिसत असून हा मोठा दिलासा असल्याचे सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे. जुलैपूर्वीचे महिने रोज अडीच- तीन हजारांच्या आसपास नवे रूग्ण आढळणाऱ्या दिल्लीत राजधानीत सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत रूग्णसंख्या १२११ वर थांबली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिल्लीत रोज सरासरी २७०० जण कोरोनाला पराभूत करून बरे होत असल्याचे आकडेवारी सांगते. 

आम्ही तुमच्याकडून 9 कोटी डोस घेऊ; लस निर्मिती आधीच या देशाने केला करार
या काळात ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात विक्रमी ८० हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आतापावेतो ३,६२८ दिल्लीकरांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपर्यंत देशभरात कोरोनाचे ४०,४२५ नवे रूग्ण आढळले असून सक्रिय रूग्णसंख्या ३ लाख ९० हजार ४५९ वर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दिल्लीत मे-जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत रूग्णसंख्या वाढत चालली होती. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील अरविंद केजरीवाल सरकारच्या सहकार्याने दिल्लीतील कोरोना निर्मूलनाची सूत्रे हाती घेतली आणि मागच्या आठवड्यापासून दिल्लीतील रूग्णसंख्येच्या सरकारी आकड्यांत घसरण दिसू लागली. नायब राज्यपाल, मुख्यमंत्री व शहा यांच्यात कोरोनाबाबत दैनंदिन संपर्क ठेवला जात असल्याचे समजते. रोज सकाळी ८ वाजता शहा स्वतः दिल्लीतील कोरोना संक्रमण परिस्थितीची माहिती घेतात व त्यानंतर ती पंतप्रधानांना दिली जाते. 

कोरोनाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्रातही साथीचा उतरता कल दिसू शकतो. अशी परिस्थिती असतानाच गुजरात, बिहार व उत्तर प्रदेशासह तमिळनाडू, तेलंगण व आंध्रातील वाढत्या व ग्रामीण भागाकडे सरकणाऱ्या संक्रमणाची परिस्थिती केंद्रीय आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. 

NASA ला अंतराळात पहिल्यांदाच सापडला अनोखा कोरोना
घरातच विलगीकरणे फायद्याचे 

प्लाझ्मा बॅंकेची स्थापना, दिल्लीत चाचण्यांची संख्या वाढवितानाच कमी लक्षणे असलेल्या रूग्णांना घरातच विलीगीकरणात ठेवण्याची केजरीवाल सरकारची योजना केंद्राने मंजूर केली, त्याचा सकारात्मक परिणाम झाला. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांपैकी दिल्लीचा रिकव्हरी दर सर्वाधिक आहे. राज्याचा रिकव्हरी दर 84 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून तो देशात सर्वाधिक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही कोरोनावर मात करून आजपासून नियमित कामकाजाला सुरवात केली. 

loading image