Delhi: मंडाविया यांच्याकडून प्रदूषण कमी करण्याचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसुख मंडाविया

मंडाविया यांच्याकडून प्रदूषण कमी करण्याचा संदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सायकल रॅलीचे नेतृत्व करत भारत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील आरोग्य मंत्रालयाच्या दालनाचे मंगळवारी उद्‌घाटन केले. यातून आरोग्यमंत्र्यांनी प्रदूषणाची परिसीमा गाठलेल्या दिल्लीत सायकल वापरण्याचा संदेश दिला.

ते याबाबत म्हणाले, की सर्वसमावेशक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आरोग्य मंत्रालयाने आपले दालन साकारले. आमच्यासाठी आरोग्य हा व्यवसाय नसून सर्वसमावेशक आरोग्यासाठी लोकांना चांगल्या सुविधा मिळायला हव्यात, हीच इच्छा आहे. सर्वसमावेशक आरोग्याची सुरुवात प्रतिबंधात्मक उपायातून होते. उदा. फिट इंडिया, योग, खेलो इंडिया हे उपक्रम सर्वसमावेशक किंवा एकूण आरोग्याचा भाग आहेत. त्याचप्रमाणे, आयुषमान भारत-आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत.

हेही वाचा: बुलडाणा : तलाठ्यास लोटपोट करून गाडी खाली घेण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वसमावेशक आरोग्याकडे वाटचाल करत आहे, असेही त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या दालनाबद्दल माहिती देताना नमूद केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त टाळता येण्याजोग्या आजारांबद्दल जागृती करण्यासाठी महिनाभरच्या मोहिमेची घोषणाही मंडाविया यांनी केली. राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त त्यांनी कोराना लसीकरणाबद्दलच्या अफवा रोखल्याबद्दल प्रसारमाध्यमांचे आभार मानले. विविध घटकांच्या सहकार्यातून आतापर्यंत लशीचे ११३ डोस देण्यात आले. आरोग्य क्षेत्रात खासगी घटकांची मदत घेतल्याने परवडणारी आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.

आयुषमान भारत डिजिटल मोहिम ही क्रांती असून डिजिटल स्वरुपात माहिती साठविण्यात मोहिमेची मदत होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मोहिमेत नोंदणी करण्याचे उद्‌घाटन करण्यात येत आहे.

- मनसुख मंडाविया, केंद्रीय आरोग्यमंत्री

loading image
go to top