

Delhi High Court On OBC Reservation
ESakal
दिल्ली उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या नियमांसंदर्भात दिल्ली सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, एकापाठोपाठ एक अधिसूचना, परिपत्रके आणि पत्रे जारी करून सरकारने असा गोंधळ निर्माण केला आहे की, केवळ उमेदवारांनाच नव्हे, तर न्यायालयालाही ओबीसी आरक्षणासाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही हे समजणे कठीण झाले आहे. दिल्ली सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात पूर्ण गोंधळ निर्माण केला आहे.