Gulabrao Patil : टाॅप अभिनेत्‍यांनी आमच्यासारखी ॲक्टिंग करून दाखवावीच; गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) चर्चेत आहेत.
Minister Gulabrao Patil open challenge to Actors
Minister Gulabrao Patil open challenge to Actorsesakal

सातारा : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) चर्चेत आहेत. आता आणखी एका विधानमुळं ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट अभिनेत्‍यांनाच चॅलेंज केलंय.

आम्ही लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडल्यासारखं करतो. वाढदिवसाला गेलो तर हॅपी बर्थ डे म्हणतो हा रोल काही साधा नाही, असं मंत्री पाटील म्हणाले.

Minister Gulabrao Patil open challenge to Actors
Shiv Sena : शिवसेनेत कोणती निवडणूक झालीच नाही; शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

चांगल्या-चांगल्या ॲक्टरांनी (Actors) आमच्यासारखी ॲक्टिंग करून दाखवावी, असं खुलं चॅलेंजही मंत्री पाटील यांनी अभिनेत्‍यांना दिलं. साताऱ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. साताऱ्यात विविध पाणीपुरवठा योजनांचा ई-भूमिपूजन सोहळा आज पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

Minister Gulabrao Patil open challenge to Actors
Nilesh Rane : ..तर बाळासाहेब वरून तुमच्यावर चप्पला फेकतील; निलेश राणे आदित्य ठाकरेंवर संतापले

पाटील म्हणाले, माझ्याकडं पाणी पुरवठा खातं असल्यामुळं आज कोणताही आमदार मला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही. आम्ही माणसात राहून मानसाळलेली माणसं आहोत, त्यामुळं सकाळी 5–25 माणसं कमी आली की असं वाटतं हवा कमी झाली की काय? आम्ही तर बदनाम जात आहे. पुढारी म्हणजे बदनाम जात, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com