

Delhi High Court (AI Photo)
esakal
दिल्ली उच्च न्यायालयात १ डिसेंबर रोजी एक अनपेक्षित प्रसंग घडला. अवमान न्याय प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित रिट याचिकेची सुनावणी सुरू असताना ज्येष्ठ वकील आर.के. सैनी तोंडावर लाल रंगाची टेप चिकटवून खंडपीठासमोर हजर झाले. त्यांच्याकडे पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव असल्याने न्यायमूर्तींनी प्रथम त्यांना दुखापत झाली का, अशी काळजी व्यक्त केली.