
एखाद्या महिलेने पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दिलेली संमती तिचे खाजगी क्षण टिपणे आणि सोशल मीडियावर अनुचित व्हिडिओ पोस्ट करता येत नाहीत, असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान म्हटले आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा म्हणाले, 'जरी तक्रारदाराने कोणत्याही वेळी लैंगिक संबंध ठेवण्यास संमती दिली असली तरी, अशा संमतीला कोणत्याही प्रकारे तिचा अनुचित व्हिडिओ कॅप्चर करण्याची आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्याची संमती म्हणून समजले जाणार नाही.