Delhi High Court lawyer Video Viral
esakal
दिल्ली हायकोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीपूर्वी वकिलाचा खासगी क्षण कॅमेरात कैद झाला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप आहे.
न्यायालयीन शिस्त आणि मर्यादा मोडल्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Delhi High Court lawyer Video Viral : कोर्टरूममध्ये न्यायाधीशांचे फटकारे, गंभीर युक्तिवाद किंवा कायदेशीर मुद्द्यांवरची चर्चा हे दृश्य अनेकदा पाहायला मिळते. मात्र, यावेळी काहीतरी वेगळंच घडलं आहे. Delhi High Court च्या व्हर्च्युअल कोर्टातील सुनावणी सुरू होण्यापूर्वीच एका वकिलाचा खासगी क्षण लाईव्ह कॅमेरात कैद झाला आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अक्षरशः वणव्यासारखा पसरतो आहे.