नवी दिल्ली - दिल्लीतील आदर्श नगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीने दिल्लीतील आदर्श नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये पत्नीचा हात कापला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य शुक्रवारी कानपूरहून आले होते. आदर्शनगर येथील हॉटेलमध्ये दोघे मुक्कामी होते. मात्र पतीने जेवणाच्या वेळी पत्नीला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पत्नीचा हात कापला.
पतीने अत्यंत निर्दयीपणे पत्नीचा हात कापून वेगळा केला. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. तसेच फरार आरोपी पतीचा शोध सुरू आहे. पतीने हे कृत्य का केलं, हे अद्याप कळू शकलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.