

Delhi IGI Airport
sakal
नवी दिल्ली : दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील बिघाडामुळे विस्कळित झालेली विमान वाहतूक अखेर सुरळीत झाली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने सांगितले, की विमानतळावरील उड्डाणांचे संचालन सुरू आहे. उड्डाणांची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी आपल्या विमानकंपन्यांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.