'नुपूर शर्मांवोरोधात निदर्शने करणारे MIM चे असू शकतात'

आज शुक्रवारच्या नमाजानंतर दिल्लीतील जामा मशिदीपासून ते प्रयागराजपर्तंय शर्मा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.
maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet
maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet

नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या प्रेक्षित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून देशभरात उफाळलेला वाद काही केल्या शांत होताना दिसून येत नाहीये. यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय गदारोळ सुरू असून, आज शुक्रवारच्या नमाजानंतर दिल्लीतील जामा मशिदीपासून (Jama Majjid) ते प्रयागराजपर्तंय शर्मा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेचीदेखील मागणी करण्यात आली. (Protest Against Nupur Sharma In Delhi )

दरम्यान, देशभरात वाढत्या विरोधानंतर आणि करण्यात येणाऱ्या विरोध प्रदर्शनानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आंदोलनकर्त्यांना समजावण्याच्या प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी नागरिकांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शुक्रवारच्या नमाजानंतर शेकोडो लोक एकत्र येत त्यांनी शर्मा यांच्या विरोधात जोरदार निर्दशने केली.

दिल्लीतील जामा मशिदीबाहरे नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे नमाजानंतर मशिदाबाहेर निर्दशने आणि घोषणाबाजी कोण होते हे आम्हाला माहित नसल्याचे दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमान यांनी म्हटले आहे. तसेच हे लोक AIMIM किंवा ओवैसी यांच्याशी संबंधित असू शकतात अशी शक्यतादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना आंदोलन करायचे असेल तर, ते करू शकतात पण आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केल्याचेही शाही इमान यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com