Delhi Liquor Case : सिसोदियांच्या जामीन अर्जावर १३ मे रोजी सुनावणी

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर १३ मे रोजी रोजी सुनावणी होईल, असे विशेष न्यायालयाकडून बुधवारी सांगण्यात आले.
Delhi Liquor Case
Delhi Liquor Casesakal

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर १३ मे रोजी रोजी सुनावणी होईल, असे विशेष न्यायालयाकडून बुधवारी सांगण्यात आले.

सिसोदिया यांनी घेतलेल्या आक्षेपावर चार दिवसांत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाला(ईडी)दिले आहेत.

Delhi Liquor Case
Congress : पित्रोदांमुळे काँग्रेसची कोंडी

सिसोदिया यांच्याविरोधातील तपास सहा महिन्यांत पूर्ण केला जाईल, असे तपास संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मागील दीड वर्षांपासून तपास सुरू आहे, असा मुद्दा सिसोदिया यांचे वकील विवेक जैन यांनी मांडला. सिसोदियांच्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, अशी विनंती तपास संस्थांनी केली, मात्र न्यायालयाने चार दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com