esakal | आता घरातच करा लग्न; दिल्लीत लॉकडाउनचे नवे नियम जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

लॉकडाउनमुळे गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. व्यापारी, महिला आणि इतर लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी लॉकडाउन आणखी काही दिवस वाढविण्याबाबत मते मांडली.

आता घरातच करा लग्न; दिल्लीत लॉकडाउनचे नवे नियम जाहीर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Delhi Lockdown Guidelines : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी असल्याने लॉकडाउनमध्ये एक आठवडा वाढ करण्यात आली आहे. तसेच या लॉकडाउनमध्ये निर्बंध पूर्वीपेक्षा कठोर करण्यात आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल () यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. गर्दी टाळण्यासाठी मेट्रो बंद ठेवली जाणार असून विवाह सोहळ्यावरही पूर्णपणे निर्बंध लादण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने सांगितले आहे.

घरी किंवा कोर्टात करा लग्न

या लॉकडाउन दरम्यान सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर पूर्णपणे बंदी असेल. ज्यांना कुणाला लग्न करायचे आहे, ते एकतरी घरी किंवा कोर्टात लग्न करू शकतात. पण या विवाह सोहळ्याला फक्त २० लोकच उपस्थित राहू शकतील. त्याहून अधिकांना परवानगी नाही. आयएसबीटी बसस्थानक, रेल्वे स्थानक, मंदिर आणि दुकानांमधील कोविड सुलब वर्तन (Covid Appropriate Behaviour) सुनिश्चित करण्याची जबाबदारी डीएम, एसपी आणि संबंधितांवर असेल, असे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्पष्ट केले.

हेही वाचा: आसाममध्ये भाजपचं नवा गडी नवं राज्य

केजरीवाल म्हणाले,

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी लॉकडाउन वाढविण्याची घोषणा करताना सांगितले की, लॉकडाउनमुळे गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. व्यापारी, महिला आणि इतर लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी लॉकडाउन आणखी काही दिवस वाढविण्याबाबत मते मांडली. कठोर निर्बंध गरजेचे आहेत, असेही काहीजण म्हणाले. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून मेट्रो बंद करण्यात आली आहे. तसेच इतर गोष्टींवरही मर्यादा आणल्या आहेत.

हेही वाचा: DRDO चं औषध कोरोनाविरोधात कसं करते काम? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट घटला

केजरीवाल पुढे म्हणाले की, कोरोना संक्रमण वाढू लागल्याने २० एप्रिलला लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. २६ एप्रिलपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट ३५ टक्क्यांपर्यंत वाढला होता. त्यानंतर तो हळूहळू कमी होऊ लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट २३ टक्क्यांवर आला आहे. नागरिकांनी आणखी काही दिवस सहकार्य केल्यास हा रेट शून्यावर येऊ शकतो. लॉकडाउनच्या कालावधीत आरोग्य यंत्रणेने संसाधनांची पूर्ती करण्यात बरीच सुधारणा केला आहे. त्यामुळे लवकरच रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असं दिसतंय.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.