Delhi Lok Sabha Election candidates will not be changed Congress clarifies Arvinder Singh Lovely Resigns kanhaiya kumar
Delhi Lok Sabha Election candidates will not be changed Congress clarifies Arvinder Singh Lovely Resigns kanhaiya kumar

Delhi Congress : दिल्लीत काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर पक्षाने स्पष्ट केली भूमिका

Arvinder Singh Lovely Resigns : लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत जे उमेदवार देण्यात आले आहेत, ते बदलले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत जे उमेदवार देण्यात आले आहेत, ते बदलले जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले आहे. दरम्यान अरविंदर सिंह लवली यांचा दिल्ली प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने मंजूर केला आहे. आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, पक्ष सोडलेला नाही, असा खुलासा लवली यांनी केला असला तरी त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. (Arvinder Singh Lovely Resigns)

दिल्ली काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली असून प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया यांच्यावर गंभीर आरोप करत लवली यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवली यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून नवीन अध्यक्ष लवकरच नेमला जाईल, असे लगोलग काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लवली यांनी काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांची भेट घेतली. काँग्रेसचा अध्यक्ष बनणे म्हणजे काट्याचा मुकुट असल्याची प्रतिक्रिया नंतर दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मागील सहा महिन्यांपासून लवली कठोर मेहनत घेत आहेत. दोन - तीन जागा मिळाल्यानंतर सर्वांच्या सहमतीने उमेदवार निवडला जाईल, असे वाटले होते, तथापि तसे झाले नाही, असेही दीक्षित म्हणाले.

Delhi Lok Sabha Election candidates will not be changed Congress clarifies Arvinder Singh Lovely Resigns kanhaiya kumar
Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

कन्हैया कुमार यांच्या विरोधात निदर्शने...


ईशान्य दिल्ली मधून निवडणूक लढवत असलेले युवा नेते कन्हैया कुमार यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. या मतदारसंघात स्थानिक उमेदवार दिला जावा, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी मौजपूर मेट्रो स्थानकासमोर निदर्शने केली. कन्हैया कुमार यांच्यासोबत उदित राज यांच्या उमेदवारीला देखील विरोध होत आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा असून यापैकी 4 जागा आम आदमी पक्ष लढवीत आहे तर 3 जागा काँग्रेस लढवीत आहे.

Delhi Lok Sabha Election candidates will not be changed Congress clarifies Arvinder Singh Lovely Resigns kanhaiya kumar
Samantha Ruth Prabhu: आधी फोटोत शिरला अन् नंतर चष्मा पळवला, बालीत फिरायला गेलेल्या समंथासोबत माकडचेष्टा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com