esakal | मोठी बातमी : शरद पवारांनी घेतली सचिन वाझे प्रकरणाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar anil deshmukh

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थाली जाऊन भेट घेतली

मोठी बातमी : शरद पवारांनी घेतली सचिन वाझे प्रकरणाची माहिती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सचिन वाझे यांच्याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर राजीनामा देण्सासाठी दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. तसेच ते राजीनामा देण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये होत आहे. त्यामुळे पवार-देशमुख यांच्यात काय बोलण होतं याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. पवारांसोबतच्या बैठकीनंतर अनिल देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात येणाऱ्या एका प्रकल्पाबाबत पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं. तसेच मुकेश अंबानी निवासस्थानाजवळील स्फोटकं प्रकरणी शरद पवारांना माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी गृहमंत्रालयाने चोख काम केल्याचं म्हटलं होतं. एक प्रकारे पवारांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. पण, दिल्लीतील भेटीमध्ये शरद पवारांनी या प्रकरणाची माहिती घेतल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील स्फोटकंप्रकरणात एनआयएने धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिस अधिकारी सचिन वाझे हेच याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा दावा एनआयएकडून करण्यात आलाय. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सचिन वाझे यांचा बचाव करणारे महाविकास आघाडी सरकारची भाषा आता बदलली आहे.

रुग्ण वाढ झाली तरी मुंबईकरांनो लॉकडाउनचं टेन्शन नका घेऊ

जिल्ह्यातील मिहान प्रकल्पामध्ये एक आंतरराष्ट्रीय कंपनी यावी, यासंबंधी चर्चेसाठी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं देशमुख म्हणाले. इंडस्ट्रियल विभागाशी शरद पवारांनी बोलावं यासाठी ही भेट झाली, आंतरराष्ट्रीय कंपनी मिहान प्रकल्पात आल्यास त्याचा फायदा नागपुरला आणि विदर्भाला होणार आहे. याचसंदर्भात ही भेट घेतली असल्याचं गृहमंत्री म्हणाले. शिवाय अनिल देशमुख यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणीही भाष्य केलं. शरद पवारांना मुंबई  स्फोटकं प्रकरणाची माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं.

सचिन वाझे प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. राज्य सरकार त्यांना सर्वोतपरी मदत करत आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पण, जोपर्यंत अंतिम रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही. रिपोर्ट आल्यानंतर जो कोणी दोषी आढलेल त्याची गय केली जाणार नाही. एनआयए आणि एटीएस आपापली कामे करत असल्याचं गृहमंत्री म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनाम्याच्या चर्चेवर मौन बाळगलं.

loading image