'वेदना पाहवत नव्हत्या'; पत्नीसह दोन मुलांचा खून करून तरुणाची आत्महत्या

delhi
delhi

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील नाहरपूर इथं पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या करून एका तरुणाने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, धीरज यादव असं आत्महत्या केलेल्या 29 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या 9 वर्षांचा मोठा मुलगा बोलू शकत नव्हता. तर लहान मुलगा दिव्यांगा होता. त्याच्या पत्नीची मानसिक स्थितीही ठिक नव्हती. यामुळे दोघांमध्ये वादही व्हायचे. पोलिसांना घरामध्ये सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये धीरजने आयुष्यावर नाराज असल्याचं म्हटलं आहे. पोलिस या प्रकरणाचा इतर बाजूंनी तपास करत आहेत. 

याबाबत पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये मुलांना होणाऱ्या वेदना आणि आपण काहीच करू शकत नाही या भावनेतून नैराश्य आलेल्या तरुणाने मुलांसह पत्नीची हत्या केली असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे की, आयुष्यात काहीच करू न शकल्याची खंत आणि अधांतरी असलेल्या भविष्याची चिंता होती. धीरजच्या आई वडिलांनी सांगितलं की, त्याची दोन्ही मुलं दिव्यांग होती. लहान मुलाची तर आयुष्यभर सेवा करावी लागेल अशी अवस्था होती. धीरज यामुळेच त्रासला होता. तो या परिस्थितीला सामोर जाऊ शकला नाही आणि सगळंच संपलं असं धीरजच्या आई वडिलांनी सांगितलं. 

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणव तायल यांनी सांगितलं की, महा सिंह यांचे कुटुंब रोहिणीतील नाहरपूर गावात राहते. तीन मजली इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये महा सिंह, त्यांची पत्नी आणि आई राहतात. त्यांचा मुलगा नीरज पहिल्या मजल्यावर राहतो. नीरज एका रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये असिस्टंट आहे. दुसऱ्या मजल्यावर धीरजचं कुटुंब राहत होतं. तो डीटीसीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर ड्रायव्हर होता. पोलिसांना धीरजच्या आत्महत्येची माहिती गुरुवारी मिळाली होती. 

तरुणाच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. धीरजची पत्नी आरती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसली तर हितेन आणि अथर्व हे दोन्ही मुलगे मृतावस्थेत होते. धीरजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. धीरजने पत्नीसह मुलांचा खून करून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com