दिल्लीत अनाज मंडी परिसरात भीषण आग; 43 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 8 डिसेंबर 2019

अग्निशमन दलाच्या तब्बल 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या ठिकाणी छोटे-छोटे कारखाने असून, अनेक कामगार तेथेच काम करून मुक्कामाला असतात. या आगीत कामगारांचा होरपळूऩ मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतील अनाज मंडी परिसरातील कारखान्याला आज (रविवार) पहाटे लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 50 जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या भीषण घटनेनंतर प्रमुख नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाज मंडी परिसरातील राणी झाँसी रस्त्यावरील एका कारखान्याला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप बचावकार्य सुरु आहे. 600 स्क्वेअर फूटमध्ये असलेल्या या कारखान्यात शाळेच्या वस्तू बनविल्या जातात.

महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

अग्निशमन दलाच्या तब्बल 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या ठिकाणी छोटे-छोटे कारखाने असून, अनेक कामगार तेथेच काम करून मुक्कामाला असतात. या आगीत कामगारांचा होरपळूऩ मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi many people dead in fire incident at Rani Jhansi Road, says Delhi Police