महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

  • महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय
  • त्रुटी दूर होईपर्यंत या परीक्षांना स्थगिती
  • पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश

महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. त्रुटी दूर होईपर्यंत या परीक्षांना स्थगिती देण्यात आलीय. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगानं अनेक निवेदनं, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्या होत्या. या अनुषंगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीला एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

महत्त्वाची बातमी :  'मी पुन्हा येईन..' वर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण, म्हणालेत..

राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील असं म्हटलंय. 

आणखी वाचा :  दुर्मिळ सागरी प्राण्यांच्या संवर्धनासाठी आता मिळणार अनुदान, कसं..

सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर (SOC) चं उद्घाटन करण्यात आलं. राज्य शासनाच्या ‘स्टेट डेटा सेंटर’च्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळांवरील डेटा ठेवलेला असतो. हा डेटा आणि क्लाऊडवरील शासनाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, कोणत्याही बाह्य प्रणालीद्वारे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी या सेंटरची स्थापन करण्यात आली आहे. 

Webtitle : all exams taken through mahaportal site are on hold until all faults are fixed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all exams taken through mahaportal are on hold until all faults are fixed