
नवी दिल्ली : दोन बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूची दिल्ली मेट्रोच्या कोचमध्ये जाहिरात केल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर लोकांनी याप्रकरणी मेट्रो प्रशासनाला जाब विचारल्यानं मेट्रोला ही जाहिरात हटवावी लागण्याची नामुष्की ओढवली.