
पुणेनंतर आता मुंबईत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामुळे आता भीती वाढली आहे. अंधेरी पूर्व येथील मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार, म्हणजेच गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण सध्या महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार घेत आहे. अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा हा पहिलाच रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता पसरली आहे.