

shorya patil case
esakal
दिल्लीतील राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून प्लॅटफॉर्मवर उडी मारून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य संपवले. मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील शौर्य प्रदीप पाटील असे या अल्पवयीन विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गाळण्याचा व्यवसाय करतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह दिल्लीत स्थायिक आहेत.