Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

CNG Car Fire : कारचालक गंभीर भाजला असून त्याच्यावर जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंब वैष्णोदेवी दर्शन करून मध्य प्रदेशातील श्योपूरला परतत होते. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी सुरू असून पोलिस तपास चालू आहे.
Burnt remains of a car after a deadly CNG gas leak fire on the Delhi-Mumbai Expressway near Alwar, claiming five lives.

Burnt remains of a car after a deadly CNG gas leak fire on the Delhi-Mumbai Expressway near Alwar, claiming five lives.

esakal

Updated on

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर एक भीषण दुर्घटना घडली. धावत्या कारमध्ये सीएनजी गॅस गळतीमुळे आग लागली अन् एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.या दुर्घटनेत कारचालकही गंभीररित्या भाजला आहे. चालकावर सध्या जयपूर येथील एसएमएस (SMS) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री उशिरा साधारणपणे ११:०० वाजण्याच्या सुमारास राजस्थानमधील अलवर जवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com