esakal | मुंबई ते दिल्ली होणार सुसाट प्रवास; नितीन गडकरींनी केलं ट्विट; आनंद महिंद्रांनी केलं स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

delhi mumbai expressway work progress nitin gadkari tweet

नव्या एक्स्प्रेस हायवेमुळं मुंबई ते दिल्ली अंतर 13 तासांत कापले जाणार आहे. यामुळं दोन शहरांमधील मलाची वाहतूक कमी वेळेत होणार आहे. मुळात राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरांवर देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा आहे.

मुंबई ते दिल्ली होणार सुसाट प्रवास; नितीन गडकरींनी केलं ट्विट; आनंद महिंद्रांनी केलं स्वागत

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली हा प्रवास आता वेगानं होणार आहे. दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस हायवेचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा हायवे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल करेल आणि, लाखो लोकांना संधी उपलब्ध करून देईल, असं गडकरी यांनी म्हटलंय. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई ते दिल्ली 13 तासांत
नव्या एक्स्प्रेस हायवेमुळं मुंबई ते दिल्ली अंतर 13 तासांत कापले जाणार आहे. यामुळं दोन शहरांमधील मलाची वाहतूक कमी वेळेत होणार आहे. मुळात राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरांवर देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा आहे. दोन्ही शहराचं महत्त्व लक्षात घेऊनच या एक्स्प्रेस हाय-वेची उभारणी करण्यात येत आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, मुंबई असा या हायवेचा मार्ग  असणार आहे. सध्या या हायवेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या हायवेच्या कामाचं भूमीपूजन दिवंगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, तात्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 2019मध्ये झालं होतं. गेल्या वर्षभरात या हायवेचं काम अतिशय वेगानं सुरू आहे.

आणखी वाचा - शेतकऱ्याच्या पोराला अमेरिकेतल्या विद्यापीठाची ऑफर

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे हा देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणेल. या हायवेमुळं लाखो लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. तुम्ही हरियाणा आणि राजस्थानमधील हायवेच्या कामाची प्रगती पाहू शकता.
- नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळण मंत्री 

आनंद महिंद्रांनी केलं स्वागत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ट्विटला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी रिप्लाय देत कामाचं स्वागत केलंय. लहानपणापासून दिल्ली-मुंबई हायवेनं अनेकदा प्रवास केलाय. त्यामुळं या हायवेचं एक्स्प्रेस-वेमध्ये रुपांतर व्हावं, असं खूप आधीपासून वाटंतय, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

कसा असेल एक्सेप्रेस वे

  • सध्या आठ पदरी हायवेचे काम सुरू 
  • भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन, 12 पदरी रस्त्यासाठी आतापासून तरतूद
  • दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी हायवे थेट कनेक्ट असेल
  • हायवेची एकूण लांबी 1 हजार 320 किलोमीटर 
  • 13 तासांत दोन शहरांमधील अंतर कापणार
  • दर 50 किलोमीटवर जेवण, चहा-नाष्टा, पेट्रोल-डिझेल, शौचालयांची व्यवस्था