
अनुराग हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा फॅन आहे. आणि त्याच्यापासून प्रेरणा घेत त्यानं हे यश मिळवलं आहे.
लखनऊ : अमेरिकेच्या आईवी लीगमध्ये (Ivy League University) आठ विद्यापीठांचा समावेश आहे. आणि त्यामुळेच तिला जगप्रसिद्धी मिळाली आहे. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठांपैकी एक आहे कॉर्नेल युनिव्हर्सिटी. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं का सांगताय. तर ऐका.
- भारतात गरीबी कमी झाली; संयुक्त राष्ट्राचा अहवाल
कॉर्नेल युनिव्हर्सिटी चर्चेत यायचं कारण म्हणजे या युनिव्हर्सिटीने भारतातील एका शेतकऱ्याच्या मुलाला त्यांच्या युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी आमंत्रित केलं आहे. एवढंच नव्हे, तर कॉर्नेल युनिव्हर्सिटीनं त्याला स्कॉलरशिप दिली असून त्याचं शिक्षण पूर्णपणे मोफत होणार आहे. उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खीरी या गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या अनुराग तिवारी याच्याकडे ही सुवर्णसंधी चालून आलीय. नुकताच सीबीएसईचा १२ वीचा निकाल लागला. आणि यामध्ये अनुरागला तब्बल ९८.२ टक्के इतके गुण मिळाले आहेत.
- ...अन् ९० वर्षीय आजींच्या डोळ्यात पाणी आलं; पुण्यात कोरोना तपासणी केंद्राचा माणुसकीशून्य कारभार!
अनुरागला इकॉनॉमिक्स आणि इतिहास या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले असून, राज्यशास्त्रमध्ये ९९, इंग्रजीत ९७, तर गणितात ९५ मार्क मिळाले आहेत. येत्या १ सप्टेंबरपासून अनुरागचे कॉर्नेल युनिव्हर्सिटीतर्फे ऑनलाइन क्लास सुरू होणार आहेत. अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडविला असल्याने जवळपास सर्वच विद्यापीठांनी ऑनलाइन क्लास सुरू केले आहेत. त्यामुळे अनुराग कॉर्नेलमध्ये इकॉनॉमिक्स आणि गणित या विषयांचे ऑनलाइन शिक्षण घेणार आहे.
अनुरागचे वडील कमलापती तिवारी हे शेतकरी आहेत, तर आई संगीता गृहिणी आहे. लखिमपूर शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सरसन या गावात अनुरागने प्राथमिक शिक्षण घेतले. सहावीमध्ये असताना त्याने विद्याज्ञान प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत आपल्या विजयी मोहिमेला प्रारंभ केला. (विद्याज्ञान ही सीतापूर येथील एक ग्रामीण अॅकॅडमी असून उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या वंचित अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करते.)
- ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!
अकरावीमध्ये असतानाच अनुरागने सॅट परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे त्याला १६०० पैकी १३७० इतके गुण मिळाले होते. त्यानंतर अर्ली डिसिजन अॅप्लिकंटमधून त्याने कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केले. आणि त्याला डिसेंबरमध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून शिक्षणासाठी बोलावणं आलं. या यशाचं श्रेय त्याने त्याच्या शाळेतील शिक्षकांना दिलं आहे.
अनुराग हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा फॅन आहे. आणि त्याच्यापासून प्रेरणा घेत त्यानं हे यश मिळवलं आहे. १२ वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो त्याच्या गावात पोहोचला, तेव्हा सर्व गावकरी त्याच्याकडे आदराने बघत होते. जे त्याला ओळखतही नव्हते, तेदेखील घरी येऊन त्याच्याशी बोलत होते. यातून त्याला खूप आनंद मिळाला, असंही त्यानं 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
(Edited by : Ashish N. Kadam)