दिल्ली, मुंबईचे तापमान पाच अंशांनी वाढणार

यंदाच्या उन्हाळ्यात देशाने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या
Temperature
Temperatureesakal

नवी दिल्ली - दिल्लीसह मुंबई, चेन्नई या शहरांच्या तापमानात १९९५ ते २०१४ च्या तुलनेत २०८० ते २०९९ दरम्यान पाच अंशांची वाढ होण्याचा इशारा ‘ग्रीनपीस’ या स्वयंसेवी संस्थेने दिला आहे. हवामान बदलावरील आंतरसरकार समितीच्या (आयपीसीसी) सहाव्या अहवालाचा अभ्यास करून देशातील उष्णतेच्या लाटांबद्दल अंदाज वर्तविण्यात आले आहेत. जागतिक कार्बन उत्सर्जन २०५० पर्यंत दुप्पट झाल्यास या महानगरांचे तापमान वाढण्याची शक्यता आहे.

जूनच्या मध्यात १९९५ ते २०१४ दरम्यान देशाच्या राजधानीचे वर्षातील कमाल तापमान ४१.९३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मात्र, २०८० ते २०९९ दरम्यान ते पाच अंशांनी वाढून तब्बल ४५.९७ अंशांवर पोचेल. त्यातही यातील काही वर्षांत कमाल तापमानाचा पारा ४८.१९ अंशांवर पोचू शकतो यंदाच्या उन्हाळ्यात दिल्लीत उष्णतेच्या लाटेत २९ एप्रिल रोजी ४३.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. ते या महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा खूपच जास्त होते. त्याचप्रमाणे, मुंबईचे वर्षभरातील कमाल तापमान १९९५ ते २०१४ दरम्यान ३९.१७ अंश सेल्सिअस होते. ते पाच अंशांनी वाढून या शतकाच्या अखेरीस २०८० ते २०९९ दरम्यान ४३.३५ वर जाण्याचा अंदाज आहे. चेन्नईचीही वाढत्या तापमानाने होरपळ होणार असून कमाल तापमान सध्याच्या ३५.१३ अंश सेल्सिअसवरून ३८.७८ अंश सेल्सिअसवर जाऊ शकते.

वाढत्या तापमानाचे तोटे

  • रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढेल.

  • कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार

  • अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता

  • शहरातील गरीब, कामगार, मुले, वृद्धांना अधिक धोका

तापमानात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने भारतात उष्णतेच्या अधिक काळ टिकणाऱ्या अभूतपूर्व लाटा येऊ शकतात. त्या सार्वजनिक आरोग्याबरोबरच अर्थव्यवस्थेलाही हानिकारक ठरतील. त्यामुळे परिसंस्थाही धोक्यात येतील. उष्णतेच्या लाटा हवामान बदलामुळे येत असल्याचे पुरेसे वैज्ञानिक पुरावे आहेत. आपण आताच पावले उचलली नाहीत तर त्यांची तीव्रता, कालावधी, वारंवारिताही मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.

- अविनाश चंचल, मोहीम व्यवस्थापक, ग्रीनपीस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com