Nikki Murder Case : निक्की यादवचा मृत्यूपूर्वीचा व्हि़डिओ आला समोर; CCTV मध्ये स्पष्ट दिसतंय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nikki Yadav Murder Case
Nikki Murder Case : निक्की यादवचा मृत्यूपूर्वीचा व्हि़डिओ आला समोर; CCTV मध्ये स्पष्ट दिसतंय...

Nikki Murder Case : निक्की यादवचा मृत्यूपूर्वीचा व्हि़डिओ आला समोर; CCTV मध्ये स्पष्ट दिसतंय...

दिल्ली पोलिसांनी निक्की यादव खून खटल्यातले काही महत्त्वाचे तपशील उघड केले आहे. निक्कीला तिचा लिव्ह इन पार्टनर साहिलने गळा आवळून मारुन टाकलं आणि त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवलं. आता निक्कीचा मृत्यूच्या अवघ्या काही क्षण पूर्वीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज निक्कीचं घर ज्या इमारतीमध्ये आहे तिथला आहे. या इमारतीमध्ये ती आरोपी साहिल गेहलोतसोबत राहत होती. या व्हि़डीओमध्ये ती पायऱ्या चढून वर येताना दिसत आहे.

हे फुटेज ९ फेब्रुवारी रोजी रात्री एकच्या सुमारास हे फुटेज ताब्यात घेण्यात आले.

साहिल गेहलोतने त्यानंतर काही वेळातच निक्की यादव या आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आणि तिचा मृतदेह नजरगढ भागातील एका बंद ढाब्यावर (खानघर) रेफ्रिजरेटरमध्ये भरला. त्याच दिवशी त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. साहिलला १४ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :crime