

Delhi Diwali Firecracker Accident in Narela
esakal
Delhi Diwali Firecracker Accident in Narela : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि रोषणाईचा उत्सव. मात्र, दिल्लीतील एका कुटुंबासाठी दिवाळीचा आनंद क्षणात दुःखात बदलला. फटाके फोडताना झालेल्या भीषण अपघातात १० वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. फटाक्याचे रॉकेट थेट मुलाच्या पोटात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा