दिल्लीकर हर्ड इम्युनिटीच्या जवळ! इतके टक्के लोकांना झालाय आतापर्यंत कोरोना

कार्तिक पुजारी
मंगळवार, 21 जुलै 2020

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना किती प्रमाणात पसरलाय याचा अहवाल समोर आला आहे. सीरो सर्वेक्षणानुसार आतापर्यंत २३.४८ टक्के दिल्लीकरांना कोरोनाची लागण झाली आहे

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये कोरोना किती प्रमाणात पसरलाय याचा अहवाल समोर आला आहे. सीरो सर्वेक्षणानुसार आतापर्यंत २३.४८ टक्के दिल्लीकरांना कोरोनाची लागण झाली आहे. याचा अर्थ या लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या आहेत. हा टक्का त्या मानाने कमी असला तरी दिल्ली हर्ड इम्युनिटीच्या जवळ जात असल्याचं दिसत आहे. अधिकतर लोक लक्षणाविना आढळल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.

"कोरोनाच्या स्थितीत उत्तर देण्यासाठी अध्यक्षांनी केवळ तीन दिवसांचा वेळ...
सीरो अहवालातील माहिती केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. सीरो सर्वेक्षण २७ जून ते १० जूलै दरम्यान करण्यात आले होते. हे सर्वेक्षण नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि दिल्ली सरकारने मिळून केले होते. सर्वेक्षणातील माहिती जाहीर करताना आरोग्य मंत्रालयाने समाधान व्यक्त केले आहे. मंत्रालयाने कोरोना संक्रमण बऱ्यापैकी अटोक्यात आल्याचं म्हटलं आहे. वेळेवर केलेली टाळेबंदी, कन्टेंमेंट झोन बनवणे आणि लोकांनी दिलेली साथ यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे.

कसे झाले सर्वेक्षण

सीरो सर्वेक्षणात दिल्लीच्या ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. इंडियन काऊंसिल फॉर मेडिकल रिसर्चच्या नियमांनुसार लोकांची अँटीबॉडी चाचणी करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात २१ हजार ३८७ नमुने गोळा करण्यात आले होते. यांच्या चाचणीनुसार किती लोंकाच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत, हे तपासण्यात आलं. व्यक्ती कोरोना विषाणूच्या संपर्कात आला होता का नाही हेही या चाचण्यांमधून कळून आलं. 

राजीव गांधींची मारेकरी नलिनीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न
हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?

हर्ड इम्युनिटी वैद्यकीय विज्ञानामधील जूनी प्रक्रिया आहे. यानुसार एकूण लोकसंख्येतील काही भाग लोकांना विषाणू संक्रमित केले जाते. ज्यामुळे लोक विषाणू प्रतिरोधी होतील, म्हणजे त्यांच्या शरीरात विषाणूच्या अँटीबॉडीज तयार होतात. यामुळे भविष्यात अशा लोकांना विषाणूची लागण होत नाही. त्यामुळे यांच्यामार्फत होणारा संसर्ग पूर्णपणे थांबला जातो.

जर दिल्लीमध्ये ६० ते ७० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित झाली, तर लोकांच्या शरीरात अँटीबॉटी तयार होती. जेव्हा विषाणूचा प्रवेश एकाकडून दुसऱ्याकडे होईल, तेव्हा त्याचा परिणाम कमी होत जाईल. असे असले तरी हर्ड इम्युनिटीबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही तज्ज्ञांनी याला धोकादायक म्हटलं आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi near to Herd Immunity So many people infected due to Corona