दिल्लीसह एनआरसी भूकंपाने हादरली; 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के

टीम ई सकाळ
Friday, 18 December 2020

वर्षभरात दिल्लीला सुमारे 15 वेळा भूकंपाचा हादरा बसला आहे. दिल्लीपासून जवळच याचे केंद्रबिंदू असल्यानं याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

नवी दिल्ली - गुरुवारी रात्री राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास दिल्लीला 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. दिल्लीसह एनआरसीच्या काही भागात या भूकंपाचे हादरे जाणवले. गुरुग्रामच्या दक्षिण पश्चिम दिशेला 45 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याची माहिती समजते. भूकंपामुळे काही वित्त किंवा जिवित हानी झाल्याचं समोर आलेलं नाही. 

दिल्लीला भूकंपाचे धक्के नेहमीच बसत असतात. याआधी 2 डिसेंबर रोजी 2.7 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हा गाझियाबाद हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 2 डिसेंबरच्या पहाटे हा भूकंपाचा धक्का बसला होता. वर्षभरात दिल्लीला सुमारे 15 वेळा भूकंपाचा हादरा बसला आहे. दिल्लीपासून जवळच याचे केंद्रबिंदू असल्यानं याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हे वाचा - डॉ. काफील खान यांना सर्वोच्च दिलासा;अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश जैसे थे

दरम्यान, गुरुवारी रात्री मणिपूरलाही भूकंपाचा धक्का बसला. चौरचंदपूर भागात झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची वित्त किंवा जिवीत हानी झालेली नाही. मात्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते. लोक त्यांची ऑफिसेस आणि घरातून बाहेर आले होते. दिल्लीतही भूकंपामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi nrc earthquake thursday night after manipur