Delhi Fire Accident : पाच मजली इमारतीला सकाळी अचानक लागली आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Delhi Palam fire incident : आग सकाळी सुमारे ६:४५ वाजता लागली आणि अतिशय वेगाने संपूर्ण इमारतीत पसरली.बचावकार्यादरम्यान दाट धूर आणि ज्वाळांमुळे अग्निशमन दलाला आत प्रवेश करणे कठीण झाले.
A devastating fire engulfs a five-storey residential building in Delhi’s Palam area, leaving multiple casualties and triggering emergency rescue operations.

A devastating fire engulfs a five-storey residential building in Delhi’s Palam area, leaving multiple casualties and triggering emergency rescue operations.

esakal

Updated on

Delhi Palam house fire : दिल्लीच्या पालम भागात एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत इतरही अनेक जण गंभीररित्या भाजले गेले आहेत. या आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच घबराट आणि गोंधळ उडाला. दरम्यान, इमारतीमध्ये अडकलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी मदतीची आर्त विनवणी करत होते. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि पोलिसांची अनेक पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com