esakal | इंटरेस्टिंग स्टोरी : कॉफी शॉपमधल्या फोटोमुळं गँगस्टर पोलिसांच्या जाळ्यात

बोलून बातमी शोधा

delhi police arrested most wanted gogi with help starbucks coffee pics

तिघांच्या कॉफी मगवर त्यांची नावे लिहिली होती. फोटो स्टार बक्समधला आहे हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दिल्ली आणि परिसरातील सगळ्या स्टारबक्समध्ये तपास सुरू केला.

इंटरेस्टिंग स्टोरी : कॉफी शॉपमधल्या फोटोमुळं गँगस्टर पोलिसांच्या जाळ्यात
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : दिल्लीतील एका कुख्यात गँगस्टरला पकडण्यासाठी पोलिसांनी लढवलेली शक्कल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. दिल्ली पोलिसांनी त्या गँगस्टरच्या मित्राच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर ठेवली होती. त्या फेसबुक अकाऊंटवर मित्रानं स्टारबक्स कॉफी शॉपमधला एक फोटो शेअर केला आणि तपासाला वेग आला. काही महिन्यांतच पोलिसांनी त्या गँगस्टरच्या मुस्क्या आवळल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

दिल्ली पोलिस जितेंदर मान ऊर्फ गोगी या गुंडाच्या मागावर 2016पासून होते. पण, तो दर वेळी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. गोगीला पकडणे हे दिल्ली पोलिसांपुढे एक आव्हान ठरले होते. दिल्ली पोलिसांची संपूर्ण प्रतिष्ठापणाला लागली होती.  खडणी, सुपारी घेऊन हत्या करणे, चोरी, शस्त्रास्त्रांची तस्करी, असे गंभीर गुन्हे गोगीवर होते. त्याला एका अटकही झाली होती. काही काळ तो तिहार जेलमध्येही होता. पण, सुटका झाल्यानंतर पुन्हा तो सक्रीय झाला होता. काही महिन्यांपूर्वी गोगीचा मित्र कुलदीप मान ऊर्फ फज्जी याने फेसबुकवर एक फोटो अपलोड केला. त्यात स्टरबक्समध्ये तिघांनी कॉफी पिल्याचे स्पष्ट होतो होते. तिघांच्या कॉफी मगवर त्यांची नावे लिहिली होती. फोटो स्टार बक्समधला आहे हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दिल्ली आणि परिसरातील सगळ्या स्टारबक्समध्ये तपास सुरू केला. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यातून धागेदोरे हाती लागले आणि गोगीसह फज्जी आणि त्याचा मित्र रोहीत यांचा ठावठिकाणा लागला. गुरुग्रामच्या सेक्टर 82मध्ये तिघेजण एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी मनिषी चंद्रा यांनी त्या फ्लॅटच्या इमारतीला घेराव घालून गोगीसह सगळ्यांना शरण येण्यासाठी आवाहन केले. त्यावेळी तिघांनी एक व्हिडिओ तयार करून, आम्ही शरण येण्यास तयार आहोत. पण, पोलिस आम्हाला मारणार आहेत, असं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण, अखेर तिघे शरण आले त्यांच्याकडून विदेशी बनावटीची 6 पिस्तुलं, 70 जिवंत काडतूसं आणि ह्युंदाई आय-20 जप्त करण्यात आली आहे. 

देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

गायिकेचा केला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोगीने गेल्याच महिन्यात रोहिनी परिसरात पवन अंचिल ठाकूर यांची हत्या केली होती. गोगीवर खंडणीचे गुन्हे होते. काही दिवसांपूर्वी प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली त्याने एका आमदारकडून खंडणी उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. हरियाणाची सिंगर हर्षिता दहिया हिच्या हत्येत गोगीच मुख्य आरोपी आहे. हर्षिताच्या भावाची आणि गोगीची तिहार तुरुंगात भेट झाली होती. त्यावेळी तिच्या भावाने गोगीला हर्षिताला मारण्याची सुपारी दिली होती. त्यामुळे गोगीने तिची हत्या केली. अशा अनेक प्रकरणांमध्ये गोगी पोलिसांना हवा होता. त्याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.