Shradha Murder Case : आफताबच्या हातातली 'ती' बॅग CCTV फुटेजमध्ये दिसली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shradha Murder Case

Shradha Murder Case : आफताबच्या हातातली 'ती' बॅग CCTV फुटेजमध्ये दिसली

New Delhi: दिल्लीतील श्रद्धा मर्डर केसमध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपी आफताबचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे.

या केसमध्ये पोलिस सध्या श्रद्धा वालकरच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करीत आहेत. यासह दिल्लीच्या परिसरात त्याने मृतदेहाच्या टाकलेल्या तुकड्यांचा तपास सुरु आहे. यातच दिल्ली पोलिसांना एक १८ ऑक्टोबरचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे.

हेही वाचाः महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताबच्या हातामध्ये एक बॅग दिसतेय. याच बॅगमधून त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे नेले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. या फुटेजमध्ये आफताब तीन वेळा येतांना आणि जातांना दिसला आहे. आज सलग सहाव्या दिवशी पोलिस महरौली जंगलात तपास करीत आहेत. जंगलामध्येच पोलिसांची एक मोठी तुकडी ठाण मांडून बसलेली आहे.

हेही वाचा: Shradha Murder Case : आफताबच्या हातातली 'ती' बॅग CCTV फुटेजध्ये दिसली

पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाचे कपडे ताब्यात घेतले आहेत. यामध्ये जास्त कपडे हे आफताबचे आहेत. याशिवाय पोलिसांनी हे कपडे अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना हत्येच्या दिवशीचे श्रद्धाचे कपडे मिळालेले नाहीत.

टॅग्स :crimedelhi