कोरोनामुळे दिल्ली पोलिसांनी शाहिनबागेतील आंदोलन गुंडाळले

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

शाहिन बाग आंदोलन
नागरिकता दुरूस्ती कायदा संसदेत पारित झाल्यानंतर त्याच्या विरोधात मुस्लिम महिलांनी दक्षिण दिल्लीतील शाहिन बाग येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान हिंसाचारही झाला होता. शाहिन बाग आंदोलनामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली होती.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरातील सर्वच देशामध्ये थैमान घातले असून अनेक देशांनी अखेर लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर कोरोनाच्या या भयंकर प्रादूर्भावामुळे भारतातीलही अनेक महत्त्वाचे प्रश्नही दुर्लक्षित झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमधील शाहिन बागेत सीएएविरोधात होणारे आंदोलनही कोरोनामुळे थांबवण्यात आले आहे. 

मागील अनेक महिने सीएए व एनआरसीविरोधात शाहिन बागेत मुस्लिम बांधवांकडून आदोलन सुरू होते. कोरोनाचे थैमान वाढल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आदोलन थांबविण्याचा व शाहिन बाग परिसर रिकामी करण्याचा आदेश दिला होता. मात्र, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे ऐकले नाही, त्यामुळे आज सकाळी दिल्ली पोलिसांनी शाहीन बाग रिकामा करण्यासाठी कारवाई केली. या कारवाईत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. आंदोलनस्थळी असलेले टेंट व पोस्टरही पोलिसांनी काढून टाकले आहे. तर शाहिन बागेत मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. पाचपेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी दिसल्यास पोलिस लगेच कारवाई करत आहेत. त्यामुळे शाहीन बागेतील आंदोलन हे आंदोलनकर्त्यांसाठीच हानिकारकर आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांना आज ही कारवाई करावी लागली. कोरोनामुळे देशात अद्याप सात जणांचा मृत्यू झाला असून, ४०० हून अधित कोरोनाग्रस्त सापडले आहे. त्यामुळए केंद्र सरकारसह, राज्य सरकारही मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत आहेत.

शाहिन बाग आंदोलन
नागरिकता दुरूस्ती कायदा संसदेत पारित झाल्यानंतर त्याच्या विरोधात मुस्लिम महिलांनी दक्षिण दिल्लीतील शाहिन बाग येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान हिंसाचारही झाला होता. शाहिन बाग आंदोलनामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Police clears the protest site in Shaheen Bagh area