
दिल्लीतील रोहिणी परिसरात बुधवारी रात्री उशिरा पोलिस आणि सिग्मा गॅंग्च्या गुंडामध्ये मोठी चकमक झाली, ज्यामध्ये बिहारमधून हवे असलेले चार कुख्यात गुन्हेगार पोलिसांनी ठार केले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. हे गुन्हेगार बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात दहशत पसरवण्याचा कट रचत होते.