Shraddha Walkar case : श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट समोर! दिल्ली पोलीस करणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Walkar case

Shraddha Walkar case : श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट समोर! दिल्ली पोलीस करणार...

Shraddha Walkar case : दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. लग्नाचा तगादा लावत असल्यानं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानंच तिची हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

दरम्यान दिल्ली पोलीस लवकरच श्रद्धा वालकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करू शकतात. दिल्ली पोलिसांनी यासाठी आरोपपत्राचा मसुदाही तयार केला आहे. जानेवारीच्या अखेरीस कोणत्याही तारखेला आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते.

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर खून प्रकरणात १०० साक्षीदारांसह फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या आधारे आरोपपत्राचा मसुदा तयार केला आहे. ३ हजार पानांचे मसुदा आरोपपत्र अंतिम आरोपपत्राचा मुख्य भाग बनण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 

हेही वाचा: चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही नमस्कार करू; शंकराचार्यांचं थेट चॅलेंज

१८ मे रोजी आफताब पूनावाला याने दिल्लीतील छतरपूर परिसरात श्रद्धाची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून जंगलात फेकण्यात आले. डीएनए रिपोर्टमध्ये छतरपूरच्या जंगलातून सापडलेली हाडे श्रद्धाचीच असल्याची पुष्टी झाली आहे. या प्रकरणानंतर आफताबबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया बाहेर येत आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: Covid Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी कोविड लस 'यादिवशी' होणार लाँच; दर...

टॅग्स :crimedelhi