Covid Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी कोविड लस 'यादिवशी' होणार लाँच; दर... | made in india covid nasal vaccine will be launched on | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nasal Vaccine of Covid 19

Covid Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी कोविड लस 'यादिवशी' होणार लाँच; दर...

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. मात्र कोरोना प्रतिबंधक कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीमुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. आता भारत बायोटेकने विकसित केलेली नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली कोविड-19 लस 26 जानेवारीपासून लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरवात करण्यात येणार, असं कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी शनिवारी सांगितले.

हेही वाचा: Pune Politics : पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला भाजपचे वेध? म्हणाले, मुनगंटीवार...

भोपाळमधील इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये (आयआयएसएफ) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एला म्हणाल्या की, गुरांचे त्वचेच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी पुढील महिन्यात स्वदेशी बनावटीची लस लंपी प्रोव्हेक्टिंड लाँच केली जाईल. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमएनआयटी) येथे आयोजित आयआयएसएफच्या 'फेस टू फेस विथ न्यू फ्रंटियर इन सायन्स' या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा: Shivsena : ठाकरे की शिंदे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कोण हवं? संतोष बांगर म्हणाले, “आम्हाला तर…”

२६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनी आमची अनुनासिक लस अधिकृतपणे लाँच केली जाईल, असे कृष्णा एला यांनी सांगितले. तर खासगी लसीकरण केंद्रांसाठी प्रति डोस ८०० रुपये मोजावे लागणार आहेत.