

Why the Modi Government Remains Silent on Toxic Air
Sakal
दिल्ली : प्रदूषणाच्या समस्येवर मोदी सरकारची दातखीळ बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील व विशेषतः दिल्लीतील या समस्येबाबत चकार शब्दही उच्चारलेला नाही. दिल्लीने जगातील सर्वात प्रदूषित शहर (गॅस चेम्बर) म्हणून बहुमान पटकावला आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकता आदी महानगरे वेगाने प्रदूषणाच्या विळख्यात ओढली जात आहेत. दिल्लीत केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्यपाल व नगरपालिका हे सारे भाजपचे. तोच भाजप दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असताना रात्रंदिवस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फैलावर घ्यायचा, सळो की पळो करून सोडायचा.