Delhi Pollution: दिल्लीत शाळा- काॅलेज सुरु ; Work From Home बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi air pollution

Delhi Pollution: दिल्लीत शाळा- काॅलेज सुरु ; Work From Home बंद

राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे गेली महिनाभर बंद असलेली शाळा काॅलेज २९ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. प्रदूषणाची पातळी कमी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सरकारी मंत्री गोपाल राय (Gopal Rai) यांनी पत्रकार परीषदेत हि माहिती दिली.

हेही वाचा: दिल्ली प्रदुषणावर सरकार काहीच करत नाही : सर्वोच्च न्यायालय

गेली महिनाभर शाळा , काॅलेज तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी दिले गेलेले वर्क फ्राॅम होम ही २९ नोव्हेंबरला संपणार आहे. सोमवारपासून कर्मचाऱ्यांनाही आॅफिसला येऊन काम करण्य़ाची सूचना देण्यात आली आहे. दिल्लीत वाढत्या प्रदूषण हा चिंतेचा विषय झाला आहे. गेली महिनाभर येथील व्यवहारवर देखील परीणाम झाला आहे.

दरम्यान, दिल्ली एनसीआरमधील वायू प्रदुषणावर सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण कमी होण्यासाठी मार्ग काढा असे सांगितले होते. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा म्हणाले,न्यायालयाने उचललेल्या पावलांमुळे 40 टक्क्यांनी प्रदुषण कमी झाल्याचे म्हंटले आहे. मात्र, प्रदूषणाची पातळी जरी थोडी कमी झाली असली, तरी आम्ही या प्रकरणावरील काम बंद करणार नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

loading image
go to top