Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

Delhi School bomb threat: एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
Delhi School
Delhi SchoolEsakal

नवी दिल्ली- एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळांना धमकीचा ई-मेल आला आहे. दिल्ली पब्लिक स्कूल (द्वारका), संस्कृती स्कूल, मदर मेरी स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल नॉयडा आणि दिल्ली पब्लिक स्कूल (आरके पुरम) यांना धमकीचे ईमेल आले आहेत.

शाळांनी विद्यार्थ्यांनी परत घरी पाठवले आहे. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉग स्कॉड आणि दिल्ली पोलीस संबंधित शाळांमध्ये पोहोचले आहेत. शाळा परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. अद्याप पोलिसांना संशयास्पद असे काही आढळून आलं नाहीये. सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Delhi School
Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने माहिती दिलीये की, सुरुवातीच्या तपासानुसार, कालपासून आतापर्यंत अनेक शाळांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. सर्वांचा पॅटर्न सारखाच दिसून येत आहे. ईमेलमध्ये तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे मेल अनेक ठिकाणी पाठवण्यात आलाय असा होतो. सध्या याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत.

Delhi School
KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com