esakal | 'मला कोरोना झालाय', दिल्ली To पुणे विमान उड्डाणावेळी प्रवाशाने सांगितल्याने खळबळ

बोलून बातमी शोधा

pune corona}

देशात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलं आहे. 

'मला कोरोना झालाय', दिल्ली To पुणे विमान उड्डाणावेळी प्रवाशाने सांगितल्याने खळबळ
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, विमान प्रवास करताना कोरोना चाचणी बंधनकारक आहे. दिल्ली ते पुणे इंडिगो विमानात एक खळबळजनक घटना घडली. विमानात असलेल्या प्रवाशाने उड्डाणावेळीच आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितल्यानं गोंधळ उडाला. यानंतर एअर लाइन्सने तात्काळ विमानातील प्रवाशांना खाली उतरवलं. 

दिल्लीतून टेक ऑफ करण्याआधी प्रवाशाला त्याचा कोरोना रिपोर्ट मिळाला होता. रिपोर्ट पाहून प्रवाशानं जोरात ओरडून सांगितलं की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावऱण निर्माण झालं. विमानात जवळपास सर्व प्रवाशी होते आणि विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होतं. दरम्यान, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशी खाली उतरवण्यात आले. 

हे वाचा - पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपचे 6 कार्यकर्ते जखमी

विमान पुण्याकडे येण्यासाठी गुरुवारी उड्डाण करण्याच्या तयारीत होतं. तेव्हा एका प्रवाशाने आपल्याला कोरोना झाल्याचं पायलटला सांगितलं. त्याची एअरपोर्टवर येण्याआधी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट विमानात बसल्यावर त्याला मिळाला होता. यात कोरोनाची लागण झाल्याचं समोर येताच विमान पूर्ण रिकामं करण्यात आलं. त्यानंतर संबंधित व्यक्तीला रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि काही वेळाने विमान पुण्याकडे निघालं.

हे वाचा - Corona Vaccine सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो हटवा, निवडणूक आयोगाचा आदेश

विमानात कोरोनाबाधित असल्याचं समजताच सर्व प्रवाशांना एका बाजुला करून खाली उतरवलं. त्यानंतर संपूर्ण विमान सॅनिटाइज करण्यात आलं. तसंच रुग्णाला रुग्णालयात पाठवल्यानंतर सर्व प्रवाशांना पीपीई कीट देऊन विमानात बसवले. संपूर्ण प्रवासात किट न काढण्याच्या सूचनाही प्रवाशांना देण्यात आल्या.