

Rahul and Priyanka Gandhi heading towards Election Commission office detained by police
Sakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजधानी दिल्लीत विरोधक आणि पोलिसांमध्ये दिवसभर हायव्होल्टेज राजकीय नाट्य रंगले. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या 'निर्वाचन सदन' मुख्यालयाकडे निघालेला 'इंडिया' आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी थेट आकाशवाणी भवनाच्या आवारात ठाण मांडत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सुमारे ८ तासांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.